ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यावर पुन्हा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यात आज, सोमवारी 1036 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्ण 676 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सरकारकडून उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले आहेत. एकट्या मुंबईत आज 676 नवे रुग्ण आढळले. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7429 वर पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 5238 इतक्या सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यावर कोरोनाचे (Covid-19) पुन्हा एकदा सावट पसरले आहे. राज्यभरात सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून ठाणे आणि पुण्यात देखील कोरोना रुग्णवाढीचा आलेख वर सरकताना दिसत आहे. ठाण्यात सध्या 1172 सक्रिय रुग्ण आहेत.