Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा हो! जनसंवाद सभेत 127 नागरिकांच्या तक्रारी

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा हो! जनसंवाद सभेत 127 नागरिकांच्या तक्रारी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरात सर्वत्र नागरिकांना मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री अंगावर धावून येतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी तक्रार सोमवारी (दि.6) क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केली.



अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 24, 13 , 7,11, 13, 14, 27 आणि 18 असा एकूण 127 नागरिकांनी 150 हून अधिक तक्रारी मांडल्या. शहरातील मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा बंदोबस्त करावा. तक्रारींकडे पशूवैद्यकीय विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही. तसेच, पाळीव प्राण्यांबाबत परवाना असणे गरजेचे आहे. याबाबतच्या कोणत्याही नियमावलीचे पालन न करता प्राणी पाळले जातात. त्यांना प्राणी पालनाबाबातच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात. अशा नागरिकांना दंड करावा, अशी तक्रार सभेत करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -