Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जीवघेणा सावकारी पाश सुटेना!

कोल्हापूर : जीवघेणा सावकारी पाश सुटेना!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; सावकारांच्या जाचातून सुटण्यासाठी एका बिल्डरने स्वत:च्या अपघाती मृत्यूचे कुभांड रचले. स्वत:च्या महागड्या विम्यातून का होईना सावकारांचे कर्ज भागेल, अशी त्याची समजूत होती; पण त्याने यासाठी एका निरपराध मजुराचा खून करून तो स्वत:च असल्याचे भासवत यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी घडली होती. हे सगळे असले, तरी सावकारी मात्र तिथेच तग धरून आहे. सावकारांच्या या पाशातून सुटका होणार का? असा प्रश्न उभा आहे.

महापालिकेच्या कंत्राटी कामगाराने सावकारांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपवले. याप्रकरणी पाच खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सावकारांकडून घेतलेल्या पैशांपोटी मृताला स्वत:चे घर, प्लॉट गमावण्याची वेळ आली. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील सावकारीचे भयावह चित्र समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -