Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरबांधकाम साहित्याचे दर दहा टक्क्यांनी उतरले

बांधकाम साहित्याचे दर दहा टक्क्यांनी उतरले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : बांधकाम साहित्याचे वाढलेले दर दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत. स्टील, वाळू व सिमेंटच्या दरात कमालीची वाढ झाली होती. बिल्डर असोसिएशनने याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर कंपन्यांनीही दरात कपात केली आहे. अजूनही हे दर कमी व्हावेत, अशी मागणी असोसिएशनने राज्य शासनाकडे केली आहे.



गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. युक्रेन-रशिया युद्धाचे कारण सांगून कंपन्यांनी बांधकाम साहित्याच्या दरात वाढ केली होती. स्टीलचा दर 45 हजार रुपये प्रतिटनवरून 80 ते 82 हजारवर पोहोचला होता. सिमेंटचे 250 ते 280 रुपयांना मिळणारे पोते 400 रु. झाले होते. विटांच्या दरामध्ये हजारी एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली होती

बांधकाम व्यावसायिकांना या अचानक वाढलेल्या दराचा मोठा फटका बसला. साहित्याच्या दरावर बांधकामाचा स्क्वेअर फुटाचा दर निश्चित होऊन त्याप्रमाणे ग्राहकांशी करार केला जातो. पण दर वाढल्याने बांधकाम निर्मिती दरात वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांशी केलेल्या करारातील किमतीपेक्षा जादा किंमतही आकारणे शक्य नव्हते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -