Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगराज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार!

राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसभेच्या सहा जागांचा फैसला आज होणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. आज या सहा जागांसाठी मतदान होणार असून आजच संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणुकीत अत्यंत अटीतटीची असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) चढाओढ पहायला मिळत आहे. अशामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपने विजय आमचाच होणार असे जाहीर केले आहे. आता नेमका विजय कोणाचा होणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.



या मतदानाला विधानभवनामध्ये सकाळी 9 वाजता सुरुवात होणार असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. रात्री 8 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत पण एका आमदाराचे निधन झाले आणि 2 आमदार तुरुंगात असल्यामुळे या निवडणुकीत एकूण 285 आमदार मतदान करणार आहेत.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. अशामध्ये प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपने (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -