Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगशाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज...

शाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष नेमके १३ जून रोजी सुरु होणार की १५ जून रोजी असा संभ्रम गेले शिक्षक – मुख्याध्यापकांमध्ये होता. अखेर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून त्यावर स्पष्टता देण्यात आली असून राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी १३ जूनपासून शैक्षणिक वर्ष शाळांनी सुरु करावे तर १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना या सूचना दिल्या जात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचार घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन २७, रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



येत्या १३ व १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन आदींचे आयोजन करावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत २४ ते २५ जून रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन २७ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -