Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावू : धनंजय महाडिक

कोल्हापूरचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावू : धनंजय महाडिक

कोल्हापूरचे अनेक प्रश्न यापूर्वी मार्गी लावण्याचे काम केले होते. अडीच वर्षांत रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्याची पुन्हा नव्याने सुरुवात करू, असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यसभेची निवडणूक अवघड, रणनितीची होती. त्यामध्ये यश मिळाले. अडीच वर्षांत खूप पराभव पत्करले. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा अनेक निवडणुकांत पराभव झाला. आताच्या विजयाने कार्यकर्त्यांना आलेले नैराश्य दूर झाले आहे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीची नेते चारही उमेदवार निवडून येतील, असे सांगत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कोल्हापुरात उत्साही वातावरण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत ठप्प झालेले सगळेच कार्यक्रम नव्याने सुरू करू, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -