Friday, November 22, 2024
Homeबिजनेसआठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. शेअर मार्केट सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पहायला मिळत आहे. आज सकाळी सेन्सेक्स 1118 अंकांच्या घसरणीसह 5318 च्या पातळीवर ओपन झाला. तर निफ्टी 324 अंकांच्या घसरणीसह 15877 वर ओपन झाला. व्यवहार सुरू झाल्यानंतर अवघ्या पच मिनिटांच्या आतच सेन्सेक्स पुन्हा कोसळला. सध्या सेन्सेक्स तब्बल 1250 पेक्षा अधिक अकांनी घसरला आहे. सेन्सेक्समधील घसरण थांबायचं नाव घेत नसल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, इंडसइंड बँक अशा जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअर मध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. याला अपवाद म्हणजे सन फार्मा आणि पॉवर ग्रिडचे शेअर मात्र हिरव्या निशाणावर कारभार करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -