ताजी बातमी ऑनलाईन टीम
टीम इंडिया ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ओदिशा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात अपयशी ठरली. भारताचा पराभव झाला असला, तरी दुसऱ्या टी 20 सामन्यातील छाती अभिमानाने फुलून येईल, असा एक सुंदर व्हिडिओ समोर आलाय.
भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना सुरु असताना, हजारो प्रेक्षक ‘मा तुझे सलाम’ हे गाणं गुणगुणत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालाय.