Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरगडहिंग्लज बसस्थानक परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग;पोलिसांचे दुर्लक्ष

गडहिंग्लज बसस्थानक परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग;पोलिसांचे दुर्लक्ष

गडहिंग्लज हे सीमाभागातील सर्वात मोठे शहर व बाजारपेठ असून अनेक नागरिक विद्यार्थी नागरिक महाविद्यालय, दवाखाना, कोर्ट, बँक आदी कामा साठी गडहिंग्लज येथे येत असतात. सध्या शैक्षणिक वर्षे सुरू होणार असून विद्यार्थ्यांची बस स्थानक परिसरात मोठी गर्दी पहावयास मिळते. त्याच बरोबर अनेक प्रवाशी देखील येत जात असतात. या सर्वांच्या दुचाकी या बस स्थानक परिसरातील दुकानांच्या समोर अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क केलेल्या आपल्याला पहावयास मिळतात. आणि यातूनच दुचाकी स्वार आणि दुकानं मालक यांच्यात वारंवार वाद होत आहेत. तर काही रोड रोमिओ विनाकारण बस स्थानक परिसरात घुटमळत असतात. काही दुचाकी चालक तर थेट हमरीतुमरी वर येत आहेत.

तर काहीजण सकाळी लवकर येऊन थेट कोणाच्याही दूकाना समोर गाडी कोल्हापूरला जात आहेत या मुळे येथील व्यावसाहीकांच्यात नाराजी पसरली आहे आधीच कोरोना मुळे मार्केट मध्ये मंदी आहे. त्यात दुचाकी चालक असा त्रास देत आहेत त्यामुळे अशा मुजोर दुचाकीस्वारांना पोलिसांनी लगाम घालावा अशी मागणी बस स्थानक परिसरातील दुकानदारांची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -