पत्नी हि आयुष्याची साथीदार असते. यमापासून आपल्या पतीचे प्राण सोडवून आणणाऱ्या सावित्रीची उद्याची वटपौर्णिमा आपण साजरी करतो. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच बीड मधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीच्या नावे असलेल्या एक कोटीच्या विम्याची रक्कम आपल्याला मिळावी म्हणून पत्नीने एका व्यक्तीच्या मदतीने पतीची हत्या केली.
पिंपरगव्हाण रोडवर एक मृतदेह आढळून आला होता. गाडी आणि टेम्पोचा अपघात होऊन तो मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यातून हि हत्या असल्याची शंका पोलिसांना आली. तो मृतदेह मंचक पवार यांचा होता. त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले होते. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर हि हत्या विम्याच्या रकमेसाठी झाल्याचे उघड झाले. नव्वद लाख पत्नीचे आणि दहा लाख मारेकऱ्यांचे अशी सुपारी पत्नीने दिली. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर पत्नीने आपणच हे कृत्य केल्याचे कबुल केले. या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यातून पूर्ण बीड जिल्हा हादरला आहे.