Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरKolhpur : बनावट सोन्याच्या सहाय्याने 13 लाखांची फसवणूक

Kolhpur : बनावट सोन्याच्या सहाय्याने 13 लाखांची फसवणूक

स्मॉल फायनान्स बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेऊन 13 लाख 46 हजारांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी बँकेच्य व्हॅल्युएटरसह कर्जदार अशा 11 जणांवर फसवणूकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद अनिस सिकंदर पठाण यांनी दिली.

व्हॅल्युएटर संतोष भालचंद्र तांबे (रा. राजारामपूरी 8 वी गल्ली, टाकाळा), सचिन सुरेश सुतार (लक्षतिर्थ वसाहत), राजू तानाजी जाधव (लाड चौक, शिवाजी पेठ), यतीन कुमार वाडकर (राजारामपूरी), सुहास साताप्पा मोहिते (रा. मोरे माने नगर), अनिकेत बळवंत कदम, प्रकाश विष्णू बुचडे (दोघे रा. यवलूज, ता. पन्हाळा), दिलीप गंगाराम चौगले (रा. खोपडेवाडी, ता. गगनबावडा), सागर रामचंद्र दवडते (रा. फुलेवाडी), अभिषेक किशोर पाटील (रा. मोरे-माने नगर), शुभम विश्वास जाधव (रा. बालींगा नागदेववाडी, ता. करवीर) अशी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जना स्मॉल बँकेची संभाजीनगर येथे शाखा आहे. या बँकेमध्ये सोन्याचे व्हॅल्युएशन करण्यासाठी संशयीत संतोष तांबे याची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 8 डिसेंबर 2021 या कालावाधित संशयीत तांबे याने 11 कर्जदारांशी संगममत करुन बनावट सोने तारणावर 16 लाख 33 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन दिले. कर्जाच्या रकमेपै लाख 87 हजार 079 इतकी रक्कम बँकेत जमा केली.

पण उर्वरित रक्कम 13 लाख 46 हजार 246 रूपये भरणा न करता बँकेची फसवणूक केली. त्यानुसार संबधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -