Wednesday, December 4, 2024
Homeअध्यात्मनवरा धनवान होण्यासाठीबायकोला करावी लागतात 'ही' 5 कामे !

नवरा धनवान होण्यासाठीबायकोला करावी लागतात ‘ही’ 5 कामे !



मित्रांनो ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करायला सुरुवात करतात. त्या घरातील पुरुष अचानक धनवान बनू लागतात. त्यांचा व्यापार व्यवसाय तेजीत चालू लागतो. त्यांना धनवान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर मनात आणले तर ते आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर तिच्या मनात आले तर ते आपल्या घराचा नाशही करू शकते.

जी स्त्री घरात अचानकपणे ही पाच कामे करू लागते तिचा पती अचानक धनवान होऊ लागतो. सर्व बाजूंनी त्याला फक्त फायदाच फायदा होऊ लागतो. त्यांच्या घरात स्वतः देवी लक्ष्मीचे आगमन होते. सुख समृद्धी संपन्नता त्यांच्या घरात आकर्षित होते.

चला तर जाणून घेऊया ती पाच कामे.
1) जी स्त्री अचानकपणे सकाळी सूर्योदयापूर्वी उठायला सुरुवात करते,  घराच्या स्वच्छतेकडे अचानकपणे लक्ष द्यायला लागली असेल, आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडायला लागली असेल तर त्या स्त्रीवर भगवंताची कृपादृष्टी पडते आणि अशा तिच्या पतीने कोणतेही कार्य हातात घेतले तर तो त्यात यशस्वी होतो. त्याला प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळते.कारण त्यांच्याबरोबर साक्षात देवी लक्ष्मी उभी असते.

2) दुसरे कार्य म्हणजे अचानक भगवंतावरील आस्था वाढणे. भगवंताविषयी, कार्याविषयी आवड निर्माण होणे, जेव्हा एखादी तरी अचानक पणे भगवंतांच्या कार्यात स्वतःहून भाग घेऊ लागते,  धार्मिक कार्यातून रूची लागते, मनापासून व श्रद्धा भावनेन भगवंतांचे पूजन करू लागते.

त्यावेळी ती सर्व देवीदेवतांच्या  कृपेस पात्र बनते. अशा स्त्री सोबत स्वतः देवी लक्ष्मी असते. अशा स्त्रीचा पती रंकाचा राजा बनू शकतो. त्याचा व्यापार व्यवसाय अचानक तेजीत चालू लागतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात.

3) तिसरे कार्य म्हणजे अचानक एखादी स्त्री जर मोठ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागली असेल, सर्वांशी गोड व मधुर संवाद साधत असेल, यामुळे सर्वजण तिच्याकडे आकर्षित होत असतील,  तिचे हृदय प्रेमाने व ममतेने भरून वाहत असेल तर अशा स्त्रियांच्या घरी देवी सरस्वती स्थायी रूपात आपले वास्तव्य करते. अशा महिलेचा पती खूप प्रगती करतो. यशाची कितीतरी शिखरे सहज पार पाडतो.  अशा महिलेकडे फक्त पाहणे ही खूप आनंद देणारे असते.

4) पुढील कार्य म्हणजे सकाळी उठून अचानकपणे आपल्या पतीचे पाय चेपू लागली असेल असे म्हटले जाते की पुरुषांच्या पायापासून घोट्यापर्यंतचा भाग शनिदेवाचा असतो तर स्त्रियांच्या हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग व शुक्र देवांचा असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या वेळी शनिवर शुक्राचा  प्रभाव पडतो त्यावेळी धनाची प्राप्ती आवश्यक होते. म्हणून ज्या वेळेस स्त्री आपल्या पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा योग बनतोतो की त्या महिलेचा पती मालामाल होऊ शकतो व अशा व्यक्तीला धन मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत नाही.  याच कारणामुळे देवी लक्ष्मी नेहमी श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असते.

5) पुढील कार्य म्हणजे आचार्य चाणक्य म्हणतात अचानकपणे स्त्रीचा कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होऊ लागतात, त्याच्या अपेक्षा कमी होऊ लागतात त्याच वेळी त्या घरात देवी महालक्ष्मीचे वास्तव्य होते. अशावेळी त्या स्त्रीचा पती धनसंपत्तीने  मालामाल होतो. त्याला प्रसिद्धी मिळते. तो नावलौकिक मिळतो व लोकप्रिय  होतो. त्या व्यक्तीच्या मानसन्मान वाढतो. कारण जेथे अपेक्षा कमी असतात तेथे देवी लक्ष्मी नेहमीच असते.

मित्रांनो ही पाच कामे करून स्त्रिया आपल्या पतीचे जीवन व पर्यायाने स्वतःचे जीवन धनसंपत्ती आणि नावलौकिकाने भरू शकतात. मित्रांनो अशाच प्रकारची विविध माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -