कोल्हापूर ते नंदवाळ हा दिंडी सोहळा यंदा १० जुलैला होणार आहे. यंदा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत झाला. यावेळी सोहळ्याच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन झाले. दिंडीप्रमुख आनंदराव लाड, दीपक गौड, बाळासाहेब पोवार, अॅड. राजेंद्र किंकर, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
९ जुलैला मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, भवानी मंडप, टिंबर मार्केट या मार्गावरुन नगरप्रदक्षिणा होईल. १० जुलैला सकाळी साडेसातला मुख्य दिंडी सोहळ्याला प्रारंभ होईल. खंडोबा तालीम परिसरात उभे रिंगण होणार आहे. पुईखडी येथे गोल रिंगण सोहळा होईल. बैठकीला अजित चव्हाण, भगवान तिवले, राजेंद्र मकोटे, सागर ठाणेकर, विनय गोखले आदी उपस्थित होते. ५ जुलैला सोहळ्याचे अंतिम स्वरुप निश्चित केले जाईल.