जयसिंगपूर शहराची गणना स्मार्ट सिटीत व्हावी यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात मोठे योगदान शहरवासीयांची आहे. मात्र पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने यात नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच हा प्रकार अलीकडच्या काळात फार वाढला असल्याचा आरोप हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांतून होत आहे पालिकेच्या कर विभाग मधील अधिकारी व कर्मचारी वगळता इतर विभागात दुपारनंतर अनेक अधिकारी व कर्मचारी विविध कारणास्तव पालिके बाहेर जात असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
त्यामुळे नागरिकांना सरकारी काम सहा महिने थांब याचा प्रत्यक्ष अनुभवातून येत आ.हे मुख्याधिकारी दोन शहराचा कारभार पाहात आहेत त्यामुळे त्यांचे थोडे दुर्लक्ष होणे जरी स्वाभाविक असली तरी नियमित कर्ज भरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी त्यांनी घ्यायला चालली असेदेखील बोलले जात आहे. बांधकाम नगररचना विद्युत आरोग्य रेकॉर्ड पाणीपुरवठा शिक्षण विभागाबरोबरच दाखले उतारे विविध शासकीय योजना यांची माहिती घेऊन त्या संबंधित कामे अडचणी सांगायला आणि दरबाराला व अन्य कामासाठी नागरिक पालिकेत येत असतात. मात्र या कामासाठी नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पालिकेतील कर्मचारी व अधिकारी कामानिमित्त बाहेर जावेच लागते ही नाकारता येत नाही.
