Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रअनैतिक संबंधातून तिघांचा खून, प्रेयसीची हत्या करुन तिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलले

अनैतिक संबंधातून तिघांचा खून, प्रेयसीची हत्या करुन तिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलले

साताऱ्यामध्ये गुन्हेगारीच्या (Satar Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये अनैतिक संबंधातून तिघांची हत्या (Satara Triple Murder Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील वेलंग गावामध्ये ही घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली त्यानंतर तिच्या दोन मुलांना विहिरीमध्ये ढकलून देत त्यांची सुद्धा हत्या केली. या तिहेरी हत्याकांडामुळे सातारा हादरले आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी (Satara Police) आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील वेलंग गावामध्ये राहणाऱ्या योगिता हुंडे या महिलेची हत्या करण्यात आली आहे. तसंच या महिलेचा मुलगा समीर आणि मुलगी तनू यांची विहिरीमध्ये ढकलून हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून योगिता आणि तिच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आरोपी दत्ता नारायण नामदास याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता योगिता आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत त्यांची हत्या केल्या असल्याचे सांगितले.

संशयित आरोपी दत्ता नामदास हा त्याची प्रेयसी योगिता आणि तिच्या मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता. पण योगिताच्या घराचा दरवाजा खूप वेळ झाला उघडत नसल्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला. तर योगिताचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ रहिमपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि योगिताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर योगिताची दोन्ही मुलं गायब होती. पोलिसांनी त्यांचा देखील शोध घेतला. दरम्यान पोलिसांनी योगिताचा प्रियकर दत्ताचा शोध घेत अकलूजमधील कामेगावमधून त्याला ताब्यात घेतले. दत्ताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने योगिताचा खून करुन तिच्या दोन मुलांची सुद्धा हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -