पंतप्रधान जन धन योजना… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना.. प्रत्येक नागरिकाचे बॅंकेत खातं असावं, या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘जन धन’ योजनेची घोषणा केली होती. अगदी शून्य रुपयात (Zero Balance savings account) या याेजनेत नागरिकांना बॅंकेत खातं सुरु करता येते..
पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांची संख्या गेल्या जानेवारी 2022 मध्ये सुमारे 44.23 कोटींवर पोचली होती. त्यातूनच ही योजना किती लोकप्रिय झालीय, याचा अंदाज येतो.. या योजनेमुळे सरकारला अनेक शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थींना देण्याची सोय झाली. त्यातून आर्थिक दुर्बल घटकांचा मोठा फायदा झाला..
अनेकांनी जन धन योजनेअंतर्गत विविध बॅंकांमध्ये आपले खाते उघडले आहेत. शिवाय, तुमचे बचत खाते असेल, तर या योजनेला ते लिंक करता येते. बचत खाते जन धन योजनेला लिंक केल्यास काय फायदे होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
बचत खाते जन धनला लिंक करण्याचे फायदे…
तुम्ही कोणतेही शुल्क न भरता, फंड ट्रान्सफर करू शकता.
या योजनेत खातेदाराला एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमाही मिळतो.
खातेदाराला मिनी स्टेटमेंट आणि मोबाईल बँकिंगची सुविधा मोफत दिली जाते.
जन धन योजनेअंतर्गत तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतचे ‘लाइफ कव्हर’ मिळते.
खातेदाराला सर्व गुंतवणुकीची माहिती दिली जाते.
तुमच्या दोन सदस्यांना जन धन योजनेअंतर्गत ‘शून्य शिल्लक खाते’ उघडता येते.
सर्वात महत्वाचे म्हणजे, ‘समाधानकारक’ व्यवहार केल्यास, या योजनेत पाच हजारांचे कर्ज (ओव्हर ड्राफ्ट) मिळेल.
जन धन योजनेमुळे देशातील प्रत्येक कुटुंब बँकेशी जोडले जात आहे. गॅस सिलिंडरचे अनुदान, सरकारच्या योजनांचे अनुदान थेट जन धनच्या खात्यात जमा केले जाते.. पूर्वी ‘झिरो बॅनल्स’ खाती वापरली जात नव्हती, पण आता ही खाती विविध कारणांसाठी वापरली जातात. बँकांनाही त्यांच्या विविध योजना लोकांपर्यंत नेता येतात.




