ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूरः राज्यात आतापर्यंत दिड टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्याने पेरणी कमी झाली आहे. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल अशी आशा वाटते. यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.कोल्हापुरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी 100 टक्के विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यव्यापी आढावा घेतला तर 28 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अशाठिकाणी दीड टक्के पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. अशाठिकाणी दुबार पेरणी घेण्यास काही अडचण येणार नाही.गेल्या वर्षी यादरम्यान 3 टक्के पेरणी झाली होती. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल आणि आमचा शेतकरी राजा सुखावेल असेही ते म्हणाले.




