Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगएमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ


एमपीएससी परीक्षांची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करण्यासाठी 24 जून 2022 पर्यंत (MPSC Applications Deadline) मुदतवाढ देण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (official website) यासंदर्भातील प्रसिद्धीप्रत्रक जारी करण्यात आले आहे.

दरम्यान एमपीएससीने पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा (MPSC Number of Attempts) रद्द केली आहे. आता उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यानिर्णयानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज भरण्याऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आयोगाने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शुल्क भरता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. एमपीएससीने शुक्रवारी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

एमपीएससीच्या माध्यमातून विविध शासकीय पदांवर नोकरभरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने या निवड प्रक्रियेत 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल सहा संधी (MPSC Exam Attempts), उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी निश्चित केल्या होत्या. निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला असून यात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -