सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व महापुरात नुकसान होणार या पिकांचा पिक विमा यामध्ये समावेश करावा अशी मागणी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली कोल्हापूर दौऱ्यावर आले असता या संदर्भातील निवेदन देण्यात आले यावेळी राजू शेट्टी म्हणाले सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस व भाजीपाला उत्पादक महापुराच्या संकट हे दरवर्षी येऊ लागले आहे. दोन्ही जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊ लागलेले आहे.
यामुळे वस व भाजीपाला उत्पादकांचे अपरिमित नुकसान झाले आहे या महापुरामुळे शासनाकडून जी नुकसान भरपाई दिली जात आहे ती अत्यंत अपुरी असून त्या मदतीतून शेतकरी मशागत करू शकत नाही यामुळे सदरच्या नुकसानभरपाई यातून सावरण्यासाठी शेतकरी पिक विमा उतरविण्यास तयार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देऊन सदर विम्याचा हप्ता शेतकरी पाटबंधारे विभाग व साखर कारखाने यांच्याकडून घेऊन राज्य सरकारच्या विमा कंपनीमार्फत पूरग्रस्त भागातील ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.