Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : मुलीची आत्महत्या; तरुणास अटक

कोल्हापूर : मुलीची आत्महत्या; तरुणास अटक

कांडवण (ता. शाहूवाडी) येथील मुलीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित सर्जेराव चिले (वय २६, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा) यास शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत केली आहे. पोलिसातून मिळालेली महिती अशी की, पंधरा दिवसांपूर्वी कांडवण येथे एका मुलीने आत्महत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू केला होता.

या प्रकरणात कांडवणमधील एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अधिक तपास केला असता, रोहित चिले याने या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडले होते. शाहूवाडी पोलिसांनी संशयित आरोपी रोहित चिले यास अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -