Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगसाताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी!

साताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

साताऱ्यामध्ये (Satara) वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील शिरवळ गावाजवळ हा अपघात झाला आहे. वारकऱ्यांच्या ट्रॉलीला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हे वारकरी आळंदीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. जखमी वारकऱ्यांना खंडाळा आणि शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे या गावामध्ये राहणारे काही वारकरी आळंदीला निघाले होते. ट्रक्टर ट्रॉलीमधून हे वारकरी पुणे-बंगळुरु महामार्गावरुन आळंदीच्या दिशेने जात होते. याचवेली शिरवळ गावाजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. शिरवळजवळ वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेनंतर वारकऱ्यांची ट्रॉली पलटी झाली. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या ट्रॉलीमधून जवळपास 43 वारकरी प्रवास करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -