ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून सध्या देशात मोठा गदारोळ माजला असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही. यावर सध्या सरकार ठाम आहे. तसेच ज्या युवकावर FI. दाखल नाही तोच अग्निवीर होऊ शकतो, अन्याथा अग्निवीर होता येणार नही, असेही सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी अग्निपथ योजनेबाबत लष्कराने संयुक्त निवेदनात विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टपणे सांगितले की यापुढे सैन्यात नियमित भरती होणार नाही.
याबात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, खूप विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी ही योजना आणली आहे. आत्ता सैन्यात केवळ अग्निवीरांचीच भरती केली जाईल. देशाच्या संक्षणासाठी युवकांच्या योगदानाची गरज आहे. देशाला तरुण बनवण्याची ही एक संधी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आंदोलनात ज्यांच्यावर एफआयआरप दाखल झाले आहेत. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत