ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरजः सांगली जिल्ह्यातील आणि मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. त्या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यानंतर खासगी सावकारीतून ही घटना घडली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी सांगली पोलिसांना मिळाली आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 8 सावकारांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या केलेले कुटुंबीय
आत्महत्या केलेल्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. र माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), पत्नी रेखा माणिक वनमोरे (45), मुलगा माणिक आदित्य वनमोरे (15), मुलगी प्रतिभा माणिक वनमोरे (21), शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), त्यांची पत्नी संगीता पोपट वनमोरे (48), मुलगा शुभम पोपट वनमोरे (28) आणि त्यांची मुलगी अर्चना पोपट वनमोरे (30) व आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (वय 72, सर्व रा. नरवाड रस्ता, म्हैसाळ) यांचा समावेश आहे.