Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरkolhapur: दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार

kolhapur: दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवे पारगाव : वाठार – बोरपाडळे राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कुल जवळ मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. पार्वती तुकाराम हुजरे (वय ७०, रा.नवे पारगाव) असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, पार्वती हुजरे या नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कुलच्या प्रांगणात महादेव मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. येथील समर्थ टायर्सच्या समोर वाठारहुन वारणानगरच्या दिशेने मोटरसायकल (एम.एच.१२. के.वाय. ९५७६) भरधाव जात होती. मोटरसायकलवर चालक ओंकार प्रकाश बिरनाळे (वय१८), प्रकाश बापु बिरणाळे व निलेश अशोक ऐवाळे (रा. चौगुले स्टॉप आळते. ता. हातकणंगले) होते. भरधाव मोटरसायकलची पायी चालत असणाऱ्या पार्वती हुजरे यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. त्या रस्त्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा झाली अतिरक्तस्त्रावा मुळे त्या जागीच ठार झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -