ताजी बातमी ऑनलाईन टीम
जत्राट ता. निपाणी येथील मलगोंडा पिरगोंडा पाटील यांच्या २.५० एकर ऊसाला आग लागून ५० हजाराचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
जत्राट येथील सर्व्हे नं.८०/१ मधील ऊसाला शेताजवळून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीच्या तारांची ठिणगी पडल्याने ही आग लागली. आगीची घटना घडताच शेजारी असलेल्या जत्राट व श्रीपेवाडी येथील नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणली.
निपाणीहून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र शेतात बंब पोहचेपर्यत नागरीकांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. विद्युत खांबांच्या ताराकडे वेळेवर लक्ष न दिल्याने असे प्रकार होवून शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यामुळे योग्य दक्षता घ्यावी यासाठी घटनास्थळी शेतकरी वर्गाने विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना थांबवून ठेवले होते. बसवेश्वर चौक पोलीसांनीही घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.