Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगसर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकार संकटात! 17 आमदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे...

सर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकार संकटात! 17 आमदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करत आहेत, तर काही नेते ‘नॉट रिचेबल’ आहेत. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी सायंकाळपासून संपर्कात नाहीत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 17 आमदार (Eknath Shinde Not Reachable with 17 MLAs) देखील असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गुजरातच्या सुरत (Surat, Gujarat) शहरातील  द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.

शिंदेसह शिवसेनेचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात
माध्यमांमधील काही रिपोर्टनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासह 17 आमदार सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. गुजरात भजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या ते संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. पाटील यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सर्व आमदार येथे हॉटेलमध्ये थांबले असून या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे ते थेट भाजपच्या संपर्कात आले असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली

दरम्यान एकनाथ शिंदेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक निकालानंतर मध्यरात्री वर्षा निवसस्थानावर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली. परंतु त्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर नव्हते. विधानपरिषद निवडणुकीत मतं कमी झाल्याने उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज तातडीने आमदारांची बैठक बोलवली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या यापूर्वीच माध्यमांतून समोर आल्या होत्या.

ठाकरे कुटुंबावर नाराज असल्याच्या चर्चा

एकनाथ शिंदे यांची आजवर शिवसेनेच्या सर्वात वरिष्ठ नेत्यांमध्ये गणना होते. शिवसेनेत ते अत्यंत प्रभावशाली मानले जातात. काही काळ ते ठाकरे कुटुंबावर नाराज होते. त्यांच्या नाराजीच्या बातम्याही अनेकवेळा समोर आल्या पण प्रत्येक वेळी शिंदेनीच त्या फेटाळून लावल्या. ते स्वत: मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा बाळगून असल्याचं बोललं जात होतं. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या हस्तक्षेपालाही त्यांनी आक्षेप घेतला होता. ते त्यांना त्यांच्या कामात कुणाचीही ढवळाढवळ नको होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -