प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला खून प्रकरणातील बिष्णोई टोळीतील कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. रंकाळा पदपथावरून सापळा रचून या कुख्यात गुंडास ताब्यात घेण्यात आले. मोहित उर्फ शेराजगबीरसिंग मलीक असे या गुंडाचे नाव आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई(action) केली.
विविध प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड मलीक हा गेल्या चार महिन्या पासून फरारी होता. त्यांची माहिती देणाऱ्यास रोहतक पोलिसांनी बक्षीस जाहिर केले होते(action). गुंड मलीक हा कोल्हापूर शहरात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले व सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने शोध सुरु केला. दरम्यान गुंड मलीक हा फिरणेसाठी रंकाळा चौपाटी वर असल्याची
गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली.रंकाळा टॉवर जवळ पदपथावर शोध घेत असताना तो पदपथावर थांबलेला दिसला(action). त्यावेळी पथकाकडे त्याचा असलेले फोटो पाहून तोच असल्याची खात्री केली.
त्यानंतर नियोजनबध्दपणे पोलिसांनी गुंड मलीक याला ताब्यात घेतले. यावेळी मलीकने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकानी योजनाबध्द रितीने पकडल्याने तो पळून जाण्यास असफल झाला. सात दिवसांपासून कोल्हापुरात वास्तव्य गुंड मलिक फरार झाल्यानंतर दिल्ली, उज्जैन, उत्तराखंड, इसार अशा ठिकाणी राहिला. दरम्यान, हरियाणातून काही मल्ल पैलवानकी करण्यासाठी शहरातील रंकाळा टॉवर व परिसरात भाडयाच्या खोलीत राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. तो आपली मूळ ओळख लपवून पैलवान ज्याप्रमाणे खोली घेवून राहतात, त्याप्रमाणे तो रंकाळ टॉवर परिसरात भाड्याची खोली घेवून सात दिवस राहिला.