Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजनचित्रपटसृष्टी हादरली! घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला अभिनेत्याचा मृतदेह

चित्रपटसृष्टी हादरली! घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला अभिनेत्याचा मृतदेह

कन्नड चित्रपटसृष्टी (Kannada Film Industry) हादरली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता सतीश वज्र (Sathish Vajra Death) याचा मृतदेह राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. सतीश वज्र याची (Sathish Vajra Murder) धारदार शस्राने हत्या करण्यात आली. राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सतीच याचा मृतदेह आढळून आला. सतीशची धाकदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. सतीशच्या मेहुण्यावर हत्येला संशय व्यक्त केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. सतीशच्या मृत्यूनंतर कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच सतीशच्या पत्नीने आत्महत्या केली होती.

सतीशने ‘लागोरी’ या चित्रपटातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते. तो कर्नाटकच्या मांड्य जिल्ह्यात राहत होता. सतीश रविवारी कामावरून घरी आला होता. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घरमालकाने सगळ्यात आधी सतीश मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

लग्नाला होता सासरच्या मंडळींचा विरोध…
मिळालेली माहिती अशी की, सतीशच्या लग्नाला त्याच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता. तरी देखील सतीश आणि त्याच्या पत्नीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे सासरची मंडळी सतीशवर नाराज होती. त्यावरून सतीश आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये मागील काही कुटुंबात वाद होते.

बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला?
बहिणीने आपल्या विरोधात जाऊन सतीशसोबत लग्न केल्याचा राग सतीशच्या मेहुण्याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी सतीशची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. पोलिस सतीशच्या घराच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -