भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. आता घरबसल्या ग्राहक बहुतांश बँकिंग कामं करु शकणार आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या (sbinet banking) ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवस्थापनानं नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बँकेच्या ग्राहकांना आता घरबसल्या बरीच कामं करता येणार आहेत.
ग्राहकांच्या सुविधेसाठी एसबीआयनं दोन टोल-फ्री नंबर (sbinet banking) जारी केले आहेत. या टोल-फ्री क्रमांकाचा वापर करुन तुम्ही घरबसल्या बँकेशी निगडीत पाच महत्वाची कामं सहज पद्धतीनं करू शकणार आहेत. महत्वाचं म्हणजे रविवारी बँक बंद असली तरी तुम्ही तुमचं रखडलेलं काम एका फोनवरुन करु शकणार आहात.
स्मार्टफोनचीही गरज भासणार नाही एसबीआय बँकेनं टोल-फ्री नंबर जारी केल्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशांनाही बँकेचे व्यवहार करता येणार आहेत. एसबीआयनं ट्विट करत 18001234 आणि 18002100 हे दोन टोल-फ्री नंबर जारी केले आहेत. एसबीआय बँकेचे ग्राहक या दोन टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन बँकेशी निगडीत पाच कामं सहजपणे करू शकणार आहात.
कोणकोणती कामं करू शकता?
एसबीआयच्या टोल फ्री क्रमांकांवरून, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती मिळू शकेल. ग्राहक या क्रमांकांवर कॉल करून त्यांचे कार्ड ब्लॉक आणि नवीन कार्ड स्थिती जाणून घेऊ शकतात. याशिवाय, तो चेकच्या डिस्पॅच स्थितीबद्दल देखील माहिती मिळवू शकतो. या क्रमांकांद्वारे, ग्राहक टीडीएस कपातीशी संबंधित माहिती मिळवू शकतात आणि ई-मेलद्वारे व्याज प्रमाणपत्र सादर करू शकतात. जुने एटीएम ब्लॉक केल्यानंतर ग्राहक नवीन एटीएमसाठी अर्ज करू शकतात.