Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!

गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले होते. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परीक्षा झाल्याच नाही. मूल्यांकन पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु असले, तरी त्याला अनेक मर्यादा येत होत्या.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही कोरोनाची दुसरी व तिसरी लाट आल्याने परिस्थिती कायम राहिली.. त्यामुळे 2021-22 मध्येही शिक्षण विभागाने कमी केलेला पाठ्यक्रम कायम ठेवला.

दरम्यान, आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झालाय. परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत, तर विदर्भातील शाळा येत्या 27 जूनपासून सुरु होणार आहेत..

अभ्यासक्रमात सूट नाही..
नियमित रुपाने शाळा सुरु झाल्याने शालेय शिक्षण विभागाने नुकताच मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू असणार आहे. शासनाने नुकतीच या निर्णयास मान्यता दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मार्च-2020 पासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव होता. त्यामुळे शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी करण्यासाठी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याच निर्णय घेतला होता. मात्र, आता ही परिस्थिती निवळली असल्याने यंदा पूर्ण अभ्यासक्रम असेल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले..

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -