Saturday, July 5, 2025
Homeतंत्रज्ञानवाहनचालकांनाे, 50 रुपयांसाठी करावी लागेल जेलवारी, ‘हे’ कागदपत्र सोबत असायलाच हवं..!

वाहनचालकांनाे, 50 रुपयांसाठी करावी लागेल जेलवारी, ‘हे’ कागदपत्र सोबत असायलाच हवं..!

रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी वाहतूक नियमांची माहिती असणं आवश्यक असतं.. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ‘ड्रायव्हिंग’ संबंधित आवश्यक कागदपत्रे.. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा यांच्यासह महत्वाचं असतं, प्रदूषण प्रमाणपत्र.. अर्थात ‘पीयूसी’..!

‘पीयूसी’ (Pollution under control) म्हणजे तुमच्या वाहनामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे एक सरकारी प्रमाणपत्र.. दुचाकी असो, वा चार चाकी, प्रवासादरम्यान हे प्रमाणपत्र जवळ बाळगणं बंधनकारक आहे.. सध्याच्या डिजिटल युग असल्याने या अत्यावश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज नाही. तुम्ही ते ‘डिजीलॉकर’मध्येही ठेवू शकता.

प्रत्येक वाहनधारकाला आपल्या गाडीची ‘पीयूसी’ (PUC) चाचणी करावीच लागते.. वाहनांतून जास्त प्रदूषण तर होत नाही ना, यासाठी ही चाचणी केली जाते. प्रत्येकालाच ते बंधनकारक असते.. काही दिवसांपूर्वीच वाहनांच्या ‘पीयूसी’ चाचणीच्या दरांत वाढ करण्यात आली होती…

वेळोवेळी ‘पीयूसी’ प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावं लागतं. त्यासाठी फक्त 50 ते 100 रुपये खर्च येतो. मात्र, ‘पीयूसी’ नसल्यास किंवा ‘पीयूसी’चे नूतनीकरण केलेले नसल्यास, मोठा दंड भरावाच लागतो. एखाद वेळी चालकाला जेलवारीही करावी लागू शकते. अवघ्या 50-100 रुपयांसाठी तुरुंगात जाण्यापेक्षा ‘पीयूसी’ नूतनीकरण केलेले बरे…

काय कारवाई होते..?

वाहनाचे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार, लगेच दंड भरावा लागतो. ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. शिवाय, चालकाचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ही 3 महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते…

असं काढा पीयूसीप्रमाणपत्र

पीयूसी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला गाडी घेऊन जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात ‘पीयूसी’ सेंटरवर जावे लागेल. तेथील कर्मचारी गाडीची तपासणी करुन ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देतात. त्यासाठी फारसा वेळही लागत नाही. शिवाय, अवघ्या 50 ते 100 रुपयांत हे प्रमाणपत्र तुमच्या हातात मिळते..

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -