Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगमहागाईचा आणखी झटका; गव्हानंतर आता तांदूळही महागला

महागाईचा आणखी झटका; गव्हानंतर आता तांदूळही महागला

आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असताना आता अजून एक झटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भारतात तांदळाची किंमत मागील पाच दिवसांमध्ये 10 टक्क्यांनी वाढली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असताना भारतातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत होती. त्यामुळे देशांतर्गत गव्हाच्या किंमतीत वाढ होऊ लागली म्हणून केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. निर्यातीवर बंदी घालूनही जगभरातून भारतीय गव्हाला बरीच मागणी येत आहे.

आता गव्हाप्रमाणे भारत तांदळावरही बंदी घालेल या शक्यतेमुळे बांगलादेशने मोठ्या प्रमाणावर तांदळाची आयात सुरु केली आहे. बांगलादेशने यंदा जून मधेच मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात सुरु केली. एवढंच नाही तर बांगलादेशने तांदूळ आयातीवरील सीमा शुल्क 62.5 टक्क्यांनी कमी केले. त्यामुळे भारतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात तांदूळ बांगलादेशला निर्यात करत आहेत. याचा परिणाम असा की, भारतात तांदळाची किंमत पाच दिवसांमध्ये 10 टक्क्यांनी वाढले आहे.

दरम्यान, मागील पाच दिवसांत भारतीय बिगर बासमती तांदळाची किंमत 350 डॉलर प्रति टनवरून 360 डॉलरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -