Tuesday, December 24, 2024
Homeतंत्रज्ञानक्रेडिट कार्डचे नियम बदलले, 'हे' काम न केल्यास दररोज 500 रुपये दंड...

क्रेडिट कार्डचे नियम बदलले, ‘हे’ काम न केल्यास दररोज 500 रुपये दंड भरावा लागेल

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहेत. या अंतर्गत, सात दिवसांत ‘ही’ एक गोष्ट केली नाही तर तुम्हाला दररोज 500 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यानुसार जाणून घेऊया काय आहे नवीन नियम.

सध्या कॅशलेस होण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. कॅशलेस पेमेंट सहज आणि लवकर करता येते. त्याच वेळी, कॅशलेस पेमेंट करण्याचे क्रेडिट कार्ड उत्तम पर्याय आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 जुलै 2022 पासून, क्रेडिटशी संबंधित काही नियम बदलणार आहेत, जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका अधिसूचनेत जाहीर केले आहे की, क्रेडिट कार्ड नियम 1 जुलै 2022 पासून लागू होतील. या नियमांमध्ये चुकीची बिले, बिल जारी करण्याच्या तारखेत चूक, बिले पाठवणे आणि क्रेडिट कार्ड बंद करणे आदींबाबत अनेक नियम बदलले गेले आहेत. 1 जुलै 2022 पासून हे बदल लागू होईल.

कंपनीच्या माध्यमातून चुकीचे क्रेडिट कार्ड बिल जारी झाल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. त्याचवेळी, कंपनीला 30 दिवसांच्या आत कार्डधारकाच्या तक्रारीचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

आरबीआयने म्हटले आहे की, कार्ड जारी करणाऱ्यांनी बिले आणि स्टेटमेंट तयार करण्यात, पाठविण्यात किंवा ईमेल करण्यात कोणताही विलंब होणार नाही याची खात्री करावी. त्याच वेळी, कार्डधारकांकडे पूर्ण वेळ असणे आवश्यक आहे जेणेकरून ते व्याजा शिवाय पेमेंट करू शकतील.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्ड धारकाने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केल्यास, क्रेडिट कार्ड जारीकर्त्याला सात कामकाजाच्या दिवसात कार्ड बंद करावे लागेल. आरबीआयच्या नियमानुसार, क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतर, कार्डधारकाला ईमेल, एसएमएस इत्यादीद्वारे कार्ड बंद झाल्याची माहिती द्यावी लागेल. दुसरीकडे, क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या कंपनीने सात कामकाजाच्या दिवसांत क्रेडिट कार्ड बंद केले नाही तर कंपनीला प्रतिदिन 500 रुपये दंड आकारला जाईल. अट एवढीच आहे की क्रेडिट कार्ड धारकांच्या खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसावी.

अवांछित क्रेडिट कार्ड जारी करण्यास RBI ने सक्त मनाई केली आहे. ग्राहकाच्या संमतीशिवाय कंपनी क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही. ग्राहकाच्या संमतीशिवाय क्रेडिट कार्ड जारी केले आणि बिल केले तर कंपनीला दंड भरावा लागेल.

RBI च्या म्हणण्यानुसार, 1 जुलै 2022 पासून क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल मागील महिन्याच्या 11 तारखेपासून सुरू होईल आणि चालू महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सुरू राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -