Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी ; बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी शहरांमध्ये बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या रुकडी येथील नागेश बागडी अमोल कोळी यांना डीवायएसपी पथकाने कोल्हापूर रोड जवळील असणाऱ्या जीव्हाजी मंगल कार्यालयाजवळ देशी विदेशी दारू सह सुमारे 86 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


इचलकरंजी शहरामध्ये बेकायदेशीरपणे राजरोसपणे दारू विकली जाते शहरातून वाईन शॉप मधून दारू घेऊन ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये राजरोसपणे चोरून विकली जाते वाईनशॉप मधून ही दारू घ्यायची व चढ्या दराने ग्रामीण भागामध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात फोफावली आहे याला आळा घालण्यासाठी इचलकरंजी शहराचे डीवायएसपी b b महामुनी यांच्या पथकाने आज कोल्हापूर रोड वरून जाणाऱ्या जीव्हाजी मंगल कार्यालय जवळ नागेश बागडी अमोल कोळी यांनी एका वाईन शॉप मधून सुमारे 34 हजार रुपये चा देशी-विदेशी दारू घेऊन रुकडीच्या दिशेने जात होते याची माहिती डीवायएसपी पथकाला मिळाली होती .

पोलिसांनी या दोघांना थांबवले असता त्यांना विचारणा केली असता त्यावेळेली त्यांनी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले आहे यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 34 हजार पाचशे रुपये चा देशी-विदेशी दारू जप्त केले आहे तसेच एक टू व्हीलर एक्टिवा जप्त करण्यात आली आहे यामध्ये नागेश बागडी अमोल कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे शहरामध्ये वाईन शॉप मधून अशी राजरोसपणे दारू दिली जात आहे अश्या दारू वाहतूक करणार्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे पोलिस मात्र आपले काम चांगल्या पद्धतीने बजावत आहेत पण राज्य उत्पादन शुल्क मात्र झोपेचे सोंग घेतले असल्याचे दिसून येत आहे शहरातून राजरोसपणे अशी दारू वाहतूक केली जाते पण शहरातील राज्य उत्पादन शुल्क काही कारवाई करत नसल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही कारवाई डिवाइस पथकातील सुनील पाटील रवी महाजन सागर हारुगले संतोष साळुंखे यांनी ही कामगिरी बजावली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -