Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगगोकाकमध्ये दोघा चोरट्यांना अटक

गोकाकमध्ये दोघा चोरट्यांना अटक

गोकाक शहर पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक करून सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सहा गाड्या जप्त केल्या.

शहरातील नाका नंबर वन येथे मोटारसायकलवर बसलेल्या युवकाकडे संशयावरून चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांना पोलिसांनी अटक करून अधिक चौकशीत त्यांनी 6 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांचा इतर राज्यातील चोरट्यांशी संबंध आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे माहिती सीपीआय गोपाळ राठोड यांनी दिली.

या कारवाईत उपनिरीक्षक घोरी, सुरेश हरगार, उमेश हडपद, एस. बी. पुजारी, सचिन होळेप्पागोळ, रमेश मुरनाळ, उदय पुजारी आदी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -