महात्मा गांधी पोलिसांची कारवाई:-
पोलीस अधीक्षक दीक्षित गेंडाम सो, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस चौकी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या आदेशानुसार मोटरसायकल चोरी करणारी टोळी यांचा शोध घेत असता आज मोटर सायकल चोरणारी टोळी अखेर जेरबंद केली. यामध्ये तीन जणांना अटक केली आहे. मुबारक हुसेनसाब बेडगी वय वर्षे १९ राहणार अगुल स्टॅन्ड गव्हारदार मल्ला राणेबुन्नूर ता.राणे बिन्नूर जि.हावेरी राज्य कर्नाटक,जाफर सादीक नजीर अहमद बेडगी वय वर्षे १९ राहणार इस्लामपूर दौलत बझार राणे बिन्नूर ता.राणे बिन्नूर जि.हावेरी राज्य कर्नाटक, महेबुब साहील अशपाक काझी वय वर्षे १९ राहणार कसाई गल्ली लक्ष्मी मार्केट मिरज या तिघांना अटक केली आहे.याच्याकडून १२ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.यामध्ये १ ॲक्सेस,१ जुपीटर,७ स्पेंडर,१ पल्सर २२०,१ एच.एफ डीलक्स,१ डीसकव्हर या गाड्या मिळून आल्या आहेत.ही कारवाई उपनिरीक्षक कुमार पाटील, उदय कुलकर्णी,सुभाष पाटील,चंद्रकांत गायकवाड,विनायक झांबरे,अमर मोहिते,सुरज पाटील,अभिजीत पाटील,गणेश कोळेकर,बसवराज कुंदगोळ,माळी,हुकिरे,अमोल आवळे,विकास कांबळे,सतीश कुमार पाटील ह्यांनी केली आहे.यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मोटार सायकल चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद तिघांना अटक..!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -