ताजी बातमी ऑनलाईन टीम
सरुड; आंबा-मानोली (ता. शाहूवाडी) येथील रातआंबी पाणी जंगल परिसरात पत्र्याच्या पेटीत सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडलेला होता. या अनोळखी महिलेच्या
खुनाचा छडा लावण्यात शाहूवाडी उपविभागीय पोलिसांच्या पथकाला तीन महिन्यांनी यश आले. वेश्या व्यवसायातील स्पर्धेतून सविता राजू निरलगे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर) या महिलेने सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. खुनाच्या घटनेत संशयित महिलेच्या आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने आरोपी महिलेची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : अर्धनग्न अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; वेश्या व्यवसायातून झाला खून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -