ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND VS ENG) उद्यापासून सुरु होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाहीय. रोहित शर्मा अजूनही कोरोनामधुन पूर्णपणे बरा झालेला नाही. गुरुवारी त्याची एंटीजेन टेस्ट करण्यात आली. त्या र रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्याजागी जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करेल. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड मध्ये बाकी राहिलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. काल मीडिया रिपोर्ट्स मध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं होत.
पण त्यानंतर हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या खेळण्याची शक्यता नाकारलेली नव्हती. रोहित शर्माच्या अजून दोन चाचण्या बाकी आहेत. या चाचण्यांच्या रिपोर्ट्सवर तो खेळणार की, नाही ते स्पष्ट होईल, असं द्रविड म्हणाले होते. अखेर रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.