ताजी बातमी ऑनलाईन टीम
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने अनपेक्षित धक्का दिलाय. या राजकिय घडामोडीत देवेद्र फडणवीसांना डावलल्यामुळे फडणवीस समर्थक नाराज। असल्याच्या चर्चा माध्यामात सुरू आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो भाजपच्या बॅनरवरून गायब झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे भाजप कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस समर्थकांनाही वाटत होते. त्याची सर्व माध्यमांमध्येही चर्चाही सुरू होती. पण एनवेळी दिल्लीतून फोन आला आणि आणि देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा आदेश काढण्यात आला. त्यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये देवेंद्रना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे असे चित्र सर्वत्र दिसत आहे.