ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी वसाहतीतील गेल्या दहा दिवसापासून पाणी येत नसल्यामुळे आज इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले पहिल्या दिवशी महापालिकेवर पाणी येत नसल्यामुळे नवीन आयुक्त यांच्यासमोर केली निदर्शने येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पाणी सुरू होईल असे आश्वासन उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे .
इचलकरंजी शहरातील असणाऱ्या महात्मा गांधी वसाहतीमध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणी येत असल्यामुळे तेथील महिला व नागरिक त्रस्त झाले आहेत शहरातील असणाऱ्या थोरात चौक ते महासत्ता चौक या रिंग रोड जवळ निरामय हॉस्पिटल जवळ सारण गटारीसाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे हा रस्ता खोदत असताना तेथील पाईपलाईन फुटली आहे ही पाईपलाईन दुरुस्ती न केल्यामुळे महात्मा गांधी वासाहती मध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणी येत नसल्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे हि पाईपलाईन दुरुस्त करावी या मागणीसाठी आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच दिवशी कामकाजा वेळी भागातील नागरिकांनी मोर्चा काढून महापालिकेचे नवचर्चित उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले .
तिकडे महापालिकेचे नवीन आयुक्त यांनी आज पदभार स्वीकारला असताना शहरातील समस्यांचा पाढा नागरिकांनी सुधाकर देशमुख आयुक्त यांना वाचून दाखवला शहरातील विविध समस्यांनी ग्रासले आहे शहराला चार ते पाच दिवस पाणी येत आहे कृष्णा पाणी योजना पंचगंगा पाणीगळती योजना याच्यावर लाखो करोडो रुपये खर्च केले जातात पण शहराला पाणी वेळेवर मिळत नाही तर काही ठिकाणी कामकाज पाण्याच्या पाईप लाईन फोडल्या जातात पण मक्तेदाराकडून वेळेवर या पाइपलाइन दुरुस्ती होत नसल्यामुळे या भागांमध्ये दुष्काळात तेरावा महिना अशी गत नागरिकांची झाली आहे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावी यासाठी इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना महात्मा गांधी वसाहत येथील नागरिकांनी निवेदन दिले आहे .
येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे पहिला महापालिकेच्या कारभाराला सुरुवात झाली असताना मोर्चाने सुरुवात झाली आहे त्यामुळे इचलकरंजी महापालिका कसा काय कारभार सांभाळणारे याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे