ताजी बातमी ऑनलाईन टीम
Agniveer Recruitment 2022 : भारतीय लष्कराने (Indian Army) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना (Agniveer Recruitment 2022) जारी केली होती. या योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करचाया आहे ते https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आठवी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांना देखील अर्ज करता येईल.
भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार, येत्या 1 जुलै म्हणजेच आजपासून अग्निवीर योजनेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. चार वर्षांसाठी ही भरती केली जाणार आहे. पण त्यानंतर उमेदवारांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा ग्रॅच्युटी मिळणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्करात 25,000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
Agniveer Recruitment 2022 : महत्त्वपूर्ण तारखा –
– अधिसूचना जारी झालेली तारीख – 20 जून 2022
– ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 1 जुलै 2022
– लेखी परीक्षेची तारीख – 16 ऑक्टोबर
– प्रशिक्षणाची तारीख – 30 डिसेंबर 2022 नंतर