बॉलिवूड एक्ट्रेस भूमी पेडनेकर (Bhumi Pednekar) हिने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर तिची बहीण समीक्षा पेडनेकर (Samiksha Pednekar) हिने ‘माय लॉबस्टर’अशी कमेंट केली आहे. मात्र, एक्ट्रेस हुमा कुरेशीने (Huma Qureshi) ‘कॉपी कॅट’ (Copy Cat) अशी कमेंट केली आहे. इतकंच नाही तर हुमाने एक फनी इमोजी देखील शेअर केली आहे. त्यामुळे भूमी आणि हुमामध्ये सोशल वॉर जुंपले आहे. हुमाने केलेल्या कमेंटमुळे भूमी पेडनेकरचे चाहते नाराज झाले असून त्यांनी हुमाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
झालं असं, की भूमीने नुकताच फोटोशूट केला होता. त्यात भूमीने ऑरेंज बिकिनी टॉप, मॅचिंग पँट आणि प्रिंटेड शर्ट परिधान केला होता. भूमीचा सुपरहॉट फोटो पाहून चाहते भरभरून दाद देत असताना हुमा कुरेशीने भूमीवर पोझ कॉपी करण्याचा आरोप केला आहे. हुमाने भूमीच्या फोटोखाली ‘कॉपी कॅट’अशी कमेंट केली आहे. त्यानंतर भूमीचा सुपर हॉट फोटो आणि हुमाची कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्टाग्राम पोस्टमध्ये असे दिसते, की भूमीने आपला चेहरा बाजुला करत डोळे बंद करून स्मीत हास्य दिले आहे. दर दुसऱ्या का फोटोमध्ये तिने माथ्यावर हात ठेवून पोझ दिली आहे. दोन्ही फोटोमध्ये भूमीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ‘बर्थडे मंथ.’ असे कॅप्शन देखील भूमीने दिले आहे. भूमीच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलेब्ससह अनेक चाहते देखील कमेंट करताना दिसत आहेत.
भूमीच्या पोस्ट तिची बहीण समीक्षा पेडनेकर हिने देखील कमेंट केली आहे. ‘माय लॉबस्टर.’ असे समीक्षाने म्हटले आहे. तर हुमा हिने भूमीच्या पोस्टखाली ‘कॉपी कॅट.’अशी कमेंट करून एक फनी इमोजी देखील शेअर केली आहे. त्यावर भूमीने रेड हार्ट आणि खेकड्याची इमोजी शेअर केली आहे. आता यावरून हुमा आणि भूमीमध्ये सोशल वॉर जुंपले आहे. तसे पाहिले तर हुमा आणि भूमी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
दरम्यान, हुमाने नुकतेच भूमीसारख्या पोझ देत फोटाशूट केले होते. भूमीने आपली कॉपी केल्याचा आरोप हुमाने केला असून तिला कॉपी कॅट असे संबोधले आहे.