Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

इचलकरंजी, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!



कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आणि तळ कोकणात भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात 4 जुलै ते 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप पश्चिम महाराष्ट्रात सुरू होती. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून त्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बरसात सुरू असून जिल्ह्यांच्या काही ठिकाणी पावसाची केवळ सुरू होते. मात्र आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे.



आज सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून आत्तापर्यंत पावसाची संततधार सुरूच आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा शहरात अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका वगळता सर्व तालुक्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. पावसाच्या सुरुवातीमुळे शेतीच्या कामांना वेग आला असून भातरोपणीला सुरुवात झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -