Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात पहिल्या पावसाचा फटका, "या" घाटात दरड कोसळली!

कोल्हापुरात पहिल्या पावसाचा फटका, “या” घाटात दरड कोसळली!



राज्यात विविध ठिकाणी पाऊस होत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्याही घटना घडत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातही काल पावसाची रिपरिप सुरू झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाचे प्रमाण वाढत आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यांसह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस सुरू झाला. यातच कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील एका ठिकाणी ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

कोठे कोसळली दरड – कोल्हापुरातील पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, कोल्हापुरातून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. येथील भुई बावडा घाटात दरड कोसळली आहे. तसेच गगनबावडा राजापूर मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसाचा पहिला फटका हा बसल्याचे समोर आले आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली आहे. तसेच गगनबावडा राजापूर मार्गावर दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -