Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगशिंदे गटाने उद्धव गटाच्या आमदारांना पाठवली अपात्रतेची नोटीस, Aaditya Thackeray यांचं नाव...

शिंदे गटाने उद्धव गटाच्या आमदारांना पाठवली अपात्रतेची नोटीस, Aaditya Thackeray यांचं नाव का नाही?

महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊनही राजकीय घडामोडी थांबण्याचे नाव घेत नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस (Disqualification Notice) बजावली आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना शिंदे गटाचे मुख्य सचिव भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र या नोटीसमध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव नाहीये.

भरत गोगावले यांनी सांगतिले की आम्ही व्हीपची अवहेलना करणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे यात नाव घेतलेले नाही. आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेचा निर्णय आता मुख्यमंत्री घेणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे. गोगावले यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांना विश्वासदर्शक ठरावात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले होते.

सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत फ्लोअर टेस्ट जिंकली. 288 सदस्यीय सभागृहात 164 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 99 आमदारांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विश्वासदर्शक ठरावाला बहुमत मिळाले अशी घोषणा केली. नुकतेच शिवसेनेच्या एका आमदाराच्या निधनानंतर विधानसभेतील आमदारांचे सध्याचे संख्याबळ 287 वर आले आहे. त्यामुळे बहुमतासाठी 144 मतांची गरज होती. परंतु सरकारला त्याहून अधिक 164 आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर 30 जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर फ्लोअर टेस्टसाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. दरम्यान दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्टपूर्वी ठाकरे गटातील आणखी एक शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील आमदार आहेत. त्यामुळे आता शिंदे यांच्या गोटातील पक्षाच्या आमदारांची संख्या 40 झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -