Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगभारतात ‘या’ वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बंदी, भारत सरकारचा मोठा निर्णय..

भारतात ‘या’ वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बंदी, भारत सरकारचा मोठा निर्णय..

भारत सरकारने जॅमर, नेटवर्क बूस्‍टर यांसह रिपीटर्सच्‍या खासगी/वैयक्तिक वापरावर बंदी घातली आहे. दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने 1 जुलै 2022 पासून वायरलेस जॅमर आणि बुस्‍टरच्‍या वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे जारी केले आहेत.

भारत सरकारच्या परवानगीशिवाय जॅमर, जीपीएस ब्लॉकर्स किंवा इतर सिग्नल जॅमिंग (Signal Jamming) उपकरणांचा वापर अवैध ठरवण्यात येईल. तसेच भारत सरकारकडून या सर्व गोष्टींच्या खाजगी खरेदी-विक्रीवर देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाचं म्हणजे अशा उपकरणाच्या ऑनलाईन खरेदी-विक्री किंवा जाहिरातीवरही निर्बंध असणार आहेत. ज्यांच्याकडे लायसन्स असेल अशा दूरसंचार सर्व्हिस प्रोव्हायडर्सना असे डिव्हाईस वापरण्यास परवानगी असेल. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वायरलेस जॅमर आणि बूस्टर/रिपीटर्सच्या वापरासंबंधी दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने 1 जुलै, 2022 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना https://dot.gov.in/spectrummanagement/advisory-proper-use-wireless-jammer-and-boosterrepeater

येथे उपलब्ध आहेत.

वर नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांननुसार परवानगी घेतल्याशिवाय भारतात सिग्नल जॅमिंग उपकरणांची जाहिरात करणे, विक्री करणे, वितरण करणे, आयात करणे किंवा अन्य प्रकारे विपणन करणे बेकायदेशीर आहे, असेही नमूद केले आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने सांगितलं की, ‘आमच्याकडून दूरसंचार विभागाने केलेल्या सुचनांचं स्वागत आहे. वायरलेस टेलीग्राफी ॲक्ट, 1933 आणि इंडिया टेलीग्राफ ॲक्ट, 1885 च्या अनुसार जॅमर, जीपीएस ब्लॉकर किंवा इतर सिग्नल जॅमिंग डिव्हाईसचा वापर, खरेदी-विक्री हा एक बेकायदेशीर आणि शिक्षेसाठी पात्र असणारा प्रकार आहे. हे डिव्हाईस दूरसंचार सेवेवर प्रतिकूल परिणाम करतात. या सूचनेमुळे निर्दोष नेटवर्क सेवा देणं शक्य होणार आहे.”, असं असोसिएशनकडून सांगण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -