Tuesday, August 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरात जन्मदात्या आईनेच केला पोटच्या मुलाचा अमानुष छळ!

कोल्हापूरात जन्मदात्या आईनेच केला पोटच्या मुलाचा अमानुष छळ!

राजरोसपणे प्रियकरासोबत सुरु असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा अमानुष छळ करण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईचा आणि निर्लज्ज प्रियकराच्या अत्याचाराने कंटाळलेल्या मुलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार(policereport) दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी तातडीने कारवाई करताना क्रुर आई आणि तिच्या पियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

मनोज पवार (वय 37, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे त्या नराधम प्रियकराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी मनोज आणि पीडित मुलाच्या आईला घरातच लैंगिक संबंध सुरु असतानाच पीडित मुलगा शाळेतून घरी परतला. अचानक मुलगा घरी आल्याने दोघांचेही सुरु असलेले लैंगिक संबंध पीडित मुलाने पाहिले.

त्यामुळे मुलाने रंगेहाथ पकडल्यानंतर अनैतिक संबंध वडिलांना सांगू नयेत, म्हणून नराधम प्रियकर आणि आईने मुलांना धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर प्रियकराच्या मदतीने विष पाजून मारून टाकेन, अशीही धमकी दिली. जन्मदात्या आईने प्रियकरासह अनेक अघोरी प्रकार केल्याचेही समोर आले आहे. मुलासह वडिलांना तसेच दुसऱ्या भावालाही विष घालून मारण्याची धमकी दिल्यानंतर असह्य झालेल्या मुलाने झाला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करून(policereport) दोघांना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -