Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगशिवसेना कार्यालय ताब्यात हवे? शिंदे गटाच्या खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे दोन मागण्या

शिवसेना कार्यालय ताब्यात हवे? शिंदे गटाच्या खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे दोन मागण्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेतून वेगळी चूल मांडणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्रीच दिल्लीत गेले आहेत. तेथे त्यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. काल कार्यकारीणीच्या नियुक्तीवेळीदेखील हे खासदार ऑनलाईन उपस्थित होते. यानंतर शिंदे गटाच्या या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.



शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वेगळ्या गटाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. यामध्ये विनायक राऊत यांच्याकडे गटनेतेपद आहे, ते राहुल शेवाळेंना आम्ही निवडले आहे. त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच आम्हाला शिवसेनेचे कार्यालय नको नवीन कार्यालय द्यावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली आहे.

या खासदारांचा समावेश

श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -