Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जादा नफ्याच्या आमिषाने 20 लाखांचा गंडा, कोल्हापुरात मलेशियन महिलेवर गुन्हा...

कोल्हापूर : जादा नफ्याच्या आमिषाने 20 लाखांचा गंडा, कोल्हापुरात मलेशियन महिलेवर गुन्हा दाखल

जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून येथील बेकरी व्यावसायिकास मलेशियातील (malaysian) एका महिलेने ऑनलाइनद्वारे तब्बल 20 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. दि. 22 मार्च ते 7 जून 2022 या काळात हा प्रकार घडला.

याबाबत उदय विठ्ठल माळी (रा. टाकाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिका लिम या (malaysian) मलेशियन महिलेवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी उदय माळी यांचा बेकरी व्यवसाय आहे. 20 मार्चला त्यांच्या मोबाईलवर संशयित रिका लिम या महिलेने सहा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवले होते. त्यात तिने आपण मलेशियात राहत असून, सिंगापूर येथे मुख्य शाखा असलेल्या जागतिक दर्जाच्या एका मार्केटिंग कंपनीत हिंदुस्थान आणि मलेशिया या दोन देशांसाठी सल्लागार अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. ही कंपनी डायमंड आणि प्लॅस्टिक संबंधीचे शेअर्स आणि प्लॉट खरेदीचा व्यवहार करते.

या कंपनीत पैसे गुंतवल्यास जादा फायदा मिळवून देतो, असे आमिष दाखवून माळी यांचा विश्वास संपादन केला. यासाठी पाठविलेल्या वेबसाईटवर खाते उघडायला लावून गुंतवणुकीचे व्यवहारही सुरू केले. माळी यांनी प्रथम 50 हजारांची गुंतवणूक केली. त्यामध्ये वाढ झाल्याने त्यांनी संशयित रिका लिम हिने दिलेल्या विविध बँक खात्यांवर 20 लाख दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली.

ही रक्कम 40 लाख 44 हजार 300 रुपयांपर्यंत वाढल्याचे लक्षात आले. हे पैसे काढताना यावर बोनस मिळणार असल्याने ‘तुम्ही पैसे काढू नका’, असे त्यांना सांगितले जात होते. मात्र, पाच दिवसांनंतर ही वेबसाईट बंद झाल्याचे तसेच रिका लिमचा संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -